|
-
-
भंडारदरा काजवा महोत्सव
English Iteniraries
भंडारदरा काजवा महोत्सव

निसर्ग टुर्स आयोजित
भंडारदरा काजवा महोत्सव
८ जून २०१८ ते ९ जून २०१८ (१ रात्र २ दिवस)
शिखर कळसूबाईच्या पायथ्याशी पश्चिम घाटात भंडारदरा , मुतखेड , चिंचोडी इ. आदिवासी खेड्यांच्या परिसरात जंगलात तसेच रंध्रा धबधब्याजवळ असलेली हजारो झाडे असंख्य काजव्यांनी भरलेली असतात. हिरडा, बेहडा, जांभूळ , आंबा ,उंबर अशा असंख्य झाडांवर रात्रीच्या मिट्ट काळोखात लक्ष्य लक्ष्य काजव्यांचा लयबद्ध लखलखाट सुरु असतो. एवढेच काय ज्या झाडांवर काजव्यांचे वास्तव्य असते ते झाड ख्रिस्तमस ट्री लायटिंग केल्यावर जसे दिसते तसे दिसते. म्हणूनच लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. जणू काही ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग वनदेवता काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाशफुले मुक्त हस्ताने सर्वत्र उधळत आहे असे वाटते. आणि हा निसर्गाचा नजारा बघण्यासाठी मे जून महिना उजाडला कि निसर्गप्रेमी भांडारदऱ्याकडे धाव घेतात.
दिनांक
सहल शुल्क (प्रती व्यक्ती)
- प्रति व्यक्ती ५०००/- रुपये
-
सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे. बोरिवली ते भंडारदरा आणि भंडारदरा ते मुंबई बस प्रवास, दोन वेळचे जेवण , सकाळचा नाश्ता, दोन वेळ चहा , एक रात्र निवासखर्च. प्रवासाला निघताना जरुरीच्या वस्तू : स्वतःची औषधे , गरम कपडे, प्रवासात सूट होतील असे कपडे व पादत्राणे.
Itineraries:
|