|
-
-
ताडोबा
अंधारी राष्ट्रीय उद्यान

निसर्ग टुर्स आयोजित
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (नागपूर) वन्यजीव निरीक्षण सफारी १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ २ रात्री, ३ दिवस
ताडोबा नॅशनल पार्क (११६.५५ चौ. कि.मी.) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य (५०८.८५ चौ.कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्हा चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे. मूळच्या आदीवासी लोकांचा देव तारू आणि अंधारी नदी मुळे या अभयारण्याला वरील नाव पडले. हे मुख्यत: बांबू (गवत) साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभुळ, अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृध्द असे जंगल आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेले. ताडोबा हे Land of the Tiger म्हणून ओळखले जाते.
ताडोबा अभयारण्यातील वन्यजीव विविधता: ४५ प्रकारचे सस्तन (Mammals) ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी(Reptiles) २८० प्रकारचे पक्षी (Birds) ९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflies) २६ प्रकारचे कोळी (Spiders) प्रमुख वैशिष्टे : मार्गदर्शक (वन्यजीव पशुपक्षी तज्ञ), यांच्या बरोबर ओपन जिप्सिने जंगल सफारी आणि वन्यजीवांवर आधरित माहिती पूर्ण संवाद.
शिबीर शुल्क (प्रती व्यक्ती)
दिनांक
ताडोबा अभयारण्यातील वन्यजीव विविधता:
- ४५ प्रकारचे सस्तन ( Mammals )
- २८० प्रकारचे पक्षी (Birds)
- ९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes)
- २६ प्रकारचे कोळी (Spider)
- ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptites)
प्रमुख वैशिष्ट्ये:
- वन्यजीव पशुपक्षी तज्ञ यांच्या बरोबर ओपन जिप्सिने जंगल सफारी आणि वन्यजीवांवर आधारित माहिती.
शिबीर शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:
- नागपूर- ताडोबा-नागपूर एसी जीप प्रवास, प्रतिदिन दोन वेळेचे जेवण, सकाळचा नाश्ता, दोन वेळा चहा, दोन रात्री , तीन दिवस निवास खर्च, (Twin Sharing / with Family) ओपन जीपमधून तज्ञांबरोबर ४ जंगल सफारी, गाईड खर्च, विविध ठिकाणी भरावी लागणारी प्रवेश फी.
शिबीर शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही:
- मुंबई-नागपूर-मुंबई रेल्वे /विमान तिकीट भाडे, शीतपेय , मिनिरल वॉटर बॉटल , रेल्वेतील खानपान, ताडोबा उद्यानात भरावी लागणारी कॅमेरा,हॅंडीकॅम फी , तसेच स्वतःसाठी वेगळी सर्विस घेतली तर त्याचा खर्च अंतर्भूत नाही. त्याचप्रमाणे लॉंड्री , टीप ,हमाल मेहनताना इ.
विशेष सूचना:
- ५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा.
सहलीचा कार्यक्रम:
|
Quick Links
|