कासचं पठार

कासचं पठार- ठोसेघर धबधबा - सज्जनगड

kass-banner

निसर्ग टुर्स आयोजित
कासचं पठार- ठोसेघर धबधबा - सज्जनगड
( महाराष्ट्राची valley of flowers )
दिनांक :२० सप्टेंबर २०१८ ते २१ सप्टेंबर २०१८
            २९ सप्टेंबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८
(१ रात्र + २ दिवस )
महाराष्ट्राचा सह्याद्री हा गडकिल्ल्यांचा  प्रदेश, पण पावसाळ्यात ह्या प्रदेशाला असे काही सौंदर्य बहाल होते की, त्या हिरव्यागार डोंगरांवर उतरणारे ढग, त्यातच ठिकठिकाणी कोसळणारे लहान मोठे धबधबे अशा या वातावरणात स्वर्गीय रानफुलांचे आगमन होते. आणि या रानफुलांमुळेच कासच्या पठारावर जणू पाचूचे बेट तयार झाले असे वाटते. पावसाळा सुरु झाला की, वेध लागतात ते महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कास पठाराचे. एरवी गड्कील्यांच्या, या दऱ्याखोऱ्याना ऑगस्ट - सप्टेंबर  महिना उजाडला कि हजारो निसर्गप्रेमी पर्यटक, वनस्पती अभ्यासक इतकेच नव्हे तर फोटोग्राफर सुद्धा कासच्या पठाराकडे धाव घेतात आणि  त्यांची  कासच्या पठारावर  रान फुलांचा महोत्सव पाहून, कास रंगी रंगले मन...  अशी अवस्था होते.


दिनांक

  • २० सप्टेंबर २०१८ ते २१ सप्टेंबर २०१८
    २९ सप्टेंबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८

  • (१ रात्र + २ दिवस )

 सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

  • रु. ६०००/- 

सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:

  • मुंबई ते कास आणि कास ते मुंबई एसी आरामदायी बस ने प्रवास
    २ वेळचे जेवण , सकाळचा नाश्ता , दोन वेळचा चहा , एक रात्र निवास खर्च , प्रवेश फी

  • सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही

              शीतपेय , वॉटर बॉटल , कास पठारावरती कॅमेरा, हॅंडीकॅम फी इ.


प्रवासाला निघताना जरुरीच्या वस्तू:

स्वतःची औषधे, गरम कपडे, छत्री, रेनकोट, पावसात सुट होतील असे कपडे व पादत्राणे.


सहलीचा कार्यक्रम:

  • १ ला दिवस : बोरीवली/ठाणे - सातारा सज्जनगड – सातारा.
    सकाळी ५.३० वाजता बोरीवली / ठाणे बसने साताऱ्याकडे प्रयाण, दुपारी सातारा येथे आगमन सज्जनगड कडे प्रयाण, रात्री सातारा येथे मुक्काम.
  • २ रा दिवस : सातारा- कास – मुंबई.
    सकाळी कास कडे प्रयाण, दुपारी कासच्या पठाराला भेट देऊन मुंबईकडे प्रयाण व आनंदी व अविस्मरणीय आठवणीसह मुंबई येथे आगमन.

वर्षा  सहलीला डिस्काउंट ची योजना लागू नाही 


Kaas Pathar 1
Kaas Pathar 2
Kaas Pathar 3
Kaas Pathar 4
Kaas Pathar 5
Kaas Pathar 6