निसर्ग टुर्स आयोजित
जामनगर (गुजरात ) पक्षी निरीक्षण सहल
जामनगर हे पुरातनकाळी 'हलार' या नावाने ओळखले जायचे. इ.स.१९२० साली महाराज श्री रणजीत यांनी आताचे जामनगर वसवले आहे. इथे निसर्ग निर्मित बेट आणि समुद्र किनारे, टेकड्या, देवळे, राजवाडे, जंगल तसेच मरीन नॅशनल पार्क, मरीन सेन्चुरी मधले समृद्ध असे पक्षी जीवन, जलचर हे इथले वैशिष्ट आहे.ह्या पार्कचा इ.स.१९८२ साली मान्यता मिळालेले देशातले पहिले नॅशनल पार्क म्हणून उलेख करावा लागेल. ह्या नॅशनल पार्क १६२.८२ चौ.कि.मी. एवढा परिसर व्यापला आहे. तसेच मरीन सेन्चुरीने ४५७.९२ चौ.कि.मी परिसर व्यापला आहे. असे हे जामनगर गुजरात राज्यामध्ये आहे आणि म्हणूनच जामनगर ला काठीयावाडचा हिरा म्हणून संबोधले जाते.
मरीन सेन्चुरी मध्ये डॉल्फिन ,ऑक्टोपस , मडस्कीपर, स्टारफिश इत्यादी , तसेच पक्षी अभयारण्यात २५० प्रकारचे पक्षी आढळतात. एवढी विविधता इथे आहे . म्हणूनच पक्षी प्रेमींचे जामनगर हे आवडते ठिकाण आहे.
प्रमुख वैशिष्ठ्ये : मार्गदर्शक : श्री कुणाल जोशी ( पक्षीतज्ञ )यांच्या बरोबर पक्षी निरीक्षणासाठी पदभ्रमण.
८ डिसेंबर २०१८ ते १३ डिसेंबर २०१८
प्रमुख वैशिष्ट्ये :
पक्षीतज्ज्ञ यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी पदभ्रमण
Special discount
- Concession for a group of minimum 5 persons Rs. 1000/- off per person on total tour cost.
- Book your seat in 120 days in advance and get Rs. 1000/- off per person on total tour cost.
विशेष सूचना: ५० % रक्कम आगाऊ भरून आपली जागा राखून ठेवणे.