|
Jungle Safaris
रणथंभोर
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, (राजस्थान)

निसर्ग टुर्स आयोजित
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, (राजस्थान)
वन्यजीव निरीक्षण सफारी
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये सवाई माधोपुर जिल्ह्यात येते. अरवली पर्वत आणि विंध्य पर्वतामध्ये हे जंगल आहे. १९८१ साली हे अभयारण्य म्हणून घोषित केले. ह्या जंगलाची व्याप्ती ३९२ चौ.कि.मी. कोअर एरिया तसेच ९४२चौ.कि.मी. बफर एरिया आहे. या अभयारण्यात २५ वाघ, ४० बिबळे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, काकर (बार्किंग डीअर ) असे कितीतरी प्रकारची जंगली जनावरे आढळतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षी आढळतात. येथे स्थलांतरित पक्षीसुद्धा येतात. या जंगलामाधेच इ.स. ९४४ सालातला देशातल्या मजबूत किल्ल्यांपैकी एक असा किल्ला अरवली व विंध्य पर्वतांच्या रांगा मिळतात तेथे बांधला गेला. हाच तो रणथंभोर किल्ला. आणि ह्या किल्ल्यावरूनच उद्यानाला रणथंभोर राष्ट्रीय उद्यान असे नाव पडले आहे. रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात. तसेच अन्य प्राणी पक्षीही दिसतात. येथे मोरांची संख्या खूप आहे. रणथंबोर जंगल उत्तरेतले सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
दिनांक
- २७ मार्च २०१९ ते ३१ मार्च २०१९
- १६ एप्रिल २०१९ ते २० एप्रिल २०१९
२ रात्री ३ दिवस
वन्यजीव
- वाघ, बिबटे, निलगाय, अस्वल, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगुर काकर असे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत
पक्षी
- २६४ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद केली आहे.
सहल शुल्क (प्रती व्यक्ती)
- १२ वर्षावरील रु. १६,५००/-
- ५ ते १२ वर्षे रुपये - १५,५००/-
सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:
- सवाई माधोपुर ते रणथंभोर जायचा व यायचा कॅन्टरने प्रवास, प्रतिदिन दोन वेळेचे जेवण, सकाळचा नाश्ता, दोन वेळ चहा, दोन रात्री तीन दिवस निवास खर्च, दोन /तीन व्यक्तींसाठी एक रूम (Twin Sharing with family),कॅन्टरने तज्ञांबरोबर चार जंगल सफारी, गाईड खर्च, प्रवेश फी.
सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही:
- मुंबई - सवाई माधोपुर - मुंबई रेल्वे तिकीट भाडे, शीतपेये , मिनिरल वॉटरबॉटल ,रेल्वेतील खान पान, कॅमेरा, हॅंडीकॅम फी , स्वत:साठी वेगळी सर्विस घेतली तर त्याचा खर्च , त्याचप्रमाणे लॉन्ड्री , टीप, टपालाचा मेहनताना इ.
विशेष सूचना:
- ५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा.
सहलीचा कार्यक्रम:
|
Quick Links
|