Jungle Safaris
चिंचोली मोराची (पुणे) महाराष्ट्र
चिंचोली मोराची - रांजणगाव

निसर्ग टुर्स आयोजित
चिंचोली मोराची (पुणे) महाराष्ट्र
हुरडा पार्टी
चिंचोली मोराची हे गाव पुण्यापासुन ५५ कि. मी. अंतरावर आहे. पेशवे कालीन येथे चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात आली. काही काळाने जिकडे तिकडे चिंचेची झाडेच झाडे झाली. त्यामुळे पक्षी विशेषत: मोर आकर्षित होऊन त्यांचे वास्तव्य या गावात झाले. म्हणून या गावाला चिंचोली मोराची असे नाव पडले. मोराची संख्या इथे माणसी एक मोर असे आहे. ३५०० वस्तींचे गाव आहे आणि मोरांची संख्या ३००० ते ३५०० एवढी आहे. म्हणूनच येथे मोरांचे दर्शन जवळून होते. त्याच प्रमाणे जगप्रसिद्ध निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रातले नैसर्गिकरीत्या झालेले वेगवेगळ्या आकाराचे रांजण बघणे म्हणजे एक वेगळाच अनुभव मिळतो, तसेच रांजणगावच्या गणपतीचे दर्शन पण होते.
दिनांक
- १० जानेवारी २०१५ ते ११ जानेवारी २०१५ ( १ रात्र + २ दिवस )
सहल शुल्क (प्रती व्यक्ती)
सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:
- प्रतीदिन दोन वेळचे जेवण, दोन वेळचा चहा, सकाळी नाश्ता, २ दिवस १ रात्री निवास खर्च, मुंबई ते चिंचोली आणि परत मुंबई बस प्रवास खर्च.
सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही:
- मिनरल वॉटर, शीत पेय, कॅमेरा व शूटिंग कॅमेरा फी.
विशेष सूचना:
- ५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा.
सहलीचा कार्यक्रम: