logo

 
Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

भरतपूर

भरतपूर पक्षी अभयारण्य

bharatpur

भरतपूर पक्षी अभयारण्य
केवलादेव घना नॅशनल पार्क
iभरतपूर, राजस्थान

केवलादेव घना नॅशनल पार्क म्हणजेच भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. भरतपूरला राजस्थानचे प्रवेशद्वार म्हणतात. भरतपूर अभायरण्य (२८.८) चौ.कि.मी क्षेत्रात आहे. हे १९५६ साली पक्षी अभयारण्य म्हणून उदयाला आले आणि याला १९८२ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला गेला. भरतपूर उद्यान हे घनदाट जंगल आहे. जंगलाचा जास्तीत जास्त भाग मध्यम उंचीची झाडे आणि खुरट्या गवतांनी व्यापला आहे. 

सायबेरिअन क्रेन ह्या पक्षाचे वास्तव्य संपूर्ण जगामध्ये फक्त भरतपूर अभयारण्या मध्येच आहे. त्याचप्रमाणे सारस क्रेन, हेरॉन पक्षाचे घरटे, स्ट्रोक इग्रेटस या पक्षांचे दर्शन अचंबित करणारे आहेत. पेटनीलम, इगल्स, payrakit इत्यादी पक्षी पाहायला मिळतात. त्याचप्रमणे हनुमान लंगुर, धीतव, सांबर, कोल्हे, स्मॉल इंडियन kayvhelat, जंगली मांजर, राखाडी मुंगुस, नीलगाय इत्यादी प्राणी या अभयारण्यात पाहायला मिळतात. असे हे पक्षी अभयारण्य पक्षी निरीक्षकांसाठी वरदान आहे.


दिनांक

 •  
 •  
 •  

सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

 •  १२ वर्षे वरील रू.-----------------
 • ०५ ते १२ वर्षे रु.------------------

सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे :

 •  प्रतिदिन दोन वेळचे जेवण , दोन वेळचा चहा, सकाळी नाष्टा,तीन दिवस दोन रात्री निवास खर्च,जीपने प्रवास ,गाईड, प्रवेश फी.

सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही :

 • मुंबई ते भरतपूर जायचे व यायचे रेल्वे तिकीट भाडे , रेल्वेतील खानपान, मिनेरल वॉटर, शीत पेय, अभयारण्यात भरावी लागणारी कॅमेरा व     हॅंडीकॉम फी.

Itineraries:

 • Day 1 : मुंबई सेंट्रल - भरतपूर, संध्याकाळी मुंबई सेंट्रल येथून भरतपूर कडे प्रयाण. रात्र ट्रेन मध्येच.
 • Day 2 : भरतपूर -भरतपूर अभयारण्य - भरतपूर, सकाळी भरतपूर (जं) आगमन ,अभयारण्याला भेट, रात्री भरतपूर येथे मुक्काम (B/L/D)
 • Day 3 : भरतपूर पक्षी निरीक्षण जंगल सफारी सकाळी व संध्याकाळी पक्षी, वन्यजीवन निरीक्षण जंगल सफारी. भरतपूर येथे रात्री मुक्काम (B/L/D)
 • Day 4 : पक्षी /वन्यजीवन निरीक्षण सफारी - मुंबई, सकाळी पक्षी आणि वन्यजीव निरीक्षण जंगल सफारी करून भरतपूर (जं) येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.
 • Day 5 : आनंदी व अविस्मराणीय आठवणींसह मुंबई येथे आगमन.

  विशेष सूचना : ५० % रक्कम आगाऊ भरून आपली जागा राखून ठेवणे.
Bharatpur 1
Bharatpur 2
Bharatpur 3
Bharatpur 4


Quick Links

Name:
Email:
 

calendar