|
-
-
बांधवगड
बांधवगड राष्ट्रीय उद्यान

निसर्ग टुर्स आयोजित जबलपूर - बांधवगड अभयारण्य - खजुराहो - जबलपूर दिनांक : १४ फेब्रुवारी २०१५ ते २१ फेब्रुवारी २०१५ ( ५ रात्री + ६ दिवस )
बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेशमध्ये शहाडोल जिल्ह्यात आहे. रेवाच्या महाराजांचे खाजगी शिकारीचे जंगल म्हणून बांधवगड जंगल अस्तित्वात आले. राजेशाहीच्या काळात वाघांची शिकार करणाऱ्यांना मान मिळत असे. त्यामुळे राजघराण्यातील लोकांनी वाघांची शिकार करण्याचा सपाटाच लावला होता. त्यावेळी महाराज मार्तंडसिंग यांना वाघांच्या प्रचंड शिकारीमुळे झालेला वाघांचा व पर्यायाने पर्यावरणाचा, जंगलाचा झालेला ऱ्हास बघवला गेला नाही व त्यांनी हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. त्यामुळेच जंगलाला संरक्षण मिळाले. पाण्याचे लहान मोठे बांध घातले गेले. असे हे जंगल १९७५ साली व्याघ्रप्रकल्प म्हणून राखीव केले गेले. हे घनदाट जंगल एकूण ४४८ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असे हे घनदाट जंगल अस्तित्वात आले. त्यात एकूण ४४ वाघांची नोंद आहे. असे हे भारतातील सर्व जंगलांपेक्षा जास्त घनता असलेले बांधवगड जंगल म्हणून वन्यप्रेमींना परिचित आहे. त्याच प्रमाणे खजुराहो हे मध्यप्रदेश मधल्या छत्तरपूर जिल्ह्यात आहे. खजुराहो हे ९ व्या शतकामध्ये वसलेले पुरातन शहर आहे. ई. स. ९५० ते ११५० या दोनशे वर्षाच्या काळात हिंदू आणि जैन पद्धतीची असंख्य देउळे बांधण्यात आली होती. पूर्वीच्या काळी या ठिकाणी ८० मंदिरे होती त्यापैकी फक्त २५ देऊळे सुस्थितीत आहेत. या मंदिरातील अप्रतिम शिल्पांचे अवलोकन करणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. अशा प्रकारे जंगल सफारी आणि वास्तुकला व शिल्पकला यांचा एकत्रित लाभ घेणे हा वेगळाच अनुभव ठरेल.
सहल शुल्क (प्रती व्यक्ती)
- १२ वर्षावरील रु. , ५ ते १२ वर्षे रुपये
सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:
- जबलपूर - बांधवगड- खजुराहो - जबलपूर जायचा व यायचा प्रवास, प्रतिदिन दोन वेळेचे जेवण, दोन वेळ चहा, पाच रात्री सहा दिवस निवास खर्च, जीप मधून जंगल सफारी, गाईड खर्च, प्रवेश फी.
सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही:
- मुंबई ते जबलपूर जायचे व यायचे रेल्वे तिकीट भाडे, रेल्वेतील खान-पान, शीत पेय, मिनरल वॉटर, बांधवगड उद्यानात भरावी लागणारी कॅमेरा/ हँडीकॅम फी.
सहलीचा कार्यक्रम:
विशेष सूचना: ५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा
|
Quick Links
|