logo

 
Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

आन्शी दांडेली व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक ) भारत

आन्शी दांडेली व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक ) भारत

Amba-Jungle=-banner

आन्शी दांडेली अभयारण्य (कर्नाटक ) भारत.

दिनांक : २० नोव्हेंबर  ते २४ नोव्हेंबर २०२३
४ रात्री ५ दिवस

कर्नाटकातील कारवार जिल्ह्यामध्ये अन्शी दांडेली हा एक प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. त्याचे नाव बदलून काली टायगर रिझर्व्ह असे डिसेंबर २०१५ ला केले. जैविक विविधतेने नटलेल्या या अभयारण्याचा विस्तार ५०० किमी असून पश्चिम घटास लागून पूर्वेस पसरत गेलेला आहे. अर्ध सदाहरित ते पानझड होणाऱ्या वनाचा या मध्ये समावेश आहे. या अभयारण्यात विपुल प्रमाणात साग, नाना , घावडा, हिरडा, बेहडा, जांभा , हेडी , वारस , बालगी या जातीचे वृक्ष व बांबूची घनदाट बेटे आढळतात. म्हणजे विविध औषधी वनस्पतीचे हे माहेरघरच आहे. उंच वृक्ष , वेली बांबूची बेटे यांनी घनदाट बनलेल्या या जंगलात बिबट्या, वाघ , हत्ती हे क्वचित इथे दिसतात. पण गवे , सांबर , भेकर , अस्वल, उदमांजर, महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला तांबूस रंगाची लांब शेपटी असणारा शेखरु इ. भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच सरपटणारे प्राणी , कोब्रा , अजगर, हरणटोळ, उडता सोनेरी सर्प, त्याचप्रमाणे २०० प्रकारचे पक्षी या अरण्यात आढळतात. तसेच इथे काली नदीमध्ये एडव्हेंचर प्रेमींना वॉटर स्पोर्ट्स , झाकूजी, बोटिंग, राफ्टिंग , केनोईन इ चा मनमुराद आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे फोटोग्राफी साठी सुद्धा आदर्श असे हे ठिकाण आहे. अशा या जैविक विविधता असणाऱ्या या जंगलात वन्य पशुपक्षी तज्ञांबरोबर पदभ्रमण म्हणजे अरण्य वाचनाची एक अनोखी संधीच आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये : मार्गदर्शक (वन्यजीव पशुपक्षी तज्ज्ञ) यांच्या बरोबर जंगल सफारी आणि पदभ्रमणाबरोबर अरण्य वाचन. 


दिनांक

  •  २० नोव्हेंबर  ते २४ नोव्हेंबर २०२३

सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

  •  १२ वर्षांवरील : रु. १५,०००/-
  • २ ते १२ वर्षे : रु.१३,५००/-

    शिबीर शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे :

    ​बेळगाव  - दांडेली - ​बेळगाव जीप प्रवास, प्रतिदिन २ वेळचे जेवण, सकाळचा नाश्ता , २ वेळचा चहा, दोन रात्री ३ दिवस निवासखर्च (TWIN Sharing ) जीप मधून सफारी, गाईड खर्च, विविध ठिकाणी भरावी लागणारी प्रवेश फी.

    शिबीर शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही :
    मुंबई - ​बेळगाव  - मुंबई रेल्वे तिकीट भाडे, रेल्वेतील खानपान, शीत पेय, मिनिरल वॉटर, दांडेली उद्यानात भरावी लागणारी कॅमेरा, हॅंडीकॅम ची फी.

    विशेष सूचना :

    ५०% रक्कम आगाऊ भरून आपली जागा राखून ठेऊन निश्चित राहा.


सहलीचा कार्यक्रम:

  • १ ला दिवस : रात्री मुंबई येथून कोल्हापूर येथे प्रयाण , रात्र ट्रेन मध्येच
  • २ रा दिवस : ​बेळगाव येथे आगमन , फ्रेश व नाश्ता करून दांडेली येथील आन्शी राष्ट्रीय उद्यानाकडे प्रयाण ,दुपारी वन्यजीव पशुपक्षी तज्ञांबरोबर पदभ्रमण , रात्री मुक्काम आन्शी कॅम्प.
  • ३ रा दिवस : सकाळी सिंथेरी रॉकवरून कुळगी नेचर कॅम्पला भेट , दुपारी जंगल सफारी करून त्याचबरोबर षण्मुख पॉईंटला भेट व रात्री मुक्काम आन्शी कॅम्प..
  • ४ था दिवस : सकाळी पशुपक्षी तज्ञांबरोबर पदभ्रमण व नाश्ता करून ​बेळगाव कडे प्रयाण व आगमन व मुंबईकडे प्रयाण

  • ५ वा दिवस : आनंदी व अविस्मरणीय आठवणींसह मुंबई येथे आगमन

विशेष सूचना :

  • प्रवासाला निघताना जरुरीच्या वस्तु :-  टोपी (शक्यतो हिरव्या/ करड्या रंगाची), पाण्याची बाटली, स्वत:ची  औषधे, पावसाळी पादत्राणे, कानटोपी/ स्कार्फ व इतर हलके समान ,छत्री, रेनकोट व पावसात वापरता येतील असे कपडे.
  • स्वताच्या जबाबदारीने आणावयाचा वस्तु :  कॅमेरा, हॅंडिकॅम, बायनाक्युलर(दुर्बीण)

सुगंधी द्रव्याचा वापर कटाक्षाने टाळावा.
वरील कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकाकडे राहतील याची कृपया नोंद
घ्यावी


 


Quick Links