logo

 
Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

आंबा जंगल खिद्रापूर (कोल्हापूर)

आंबा  जंगल - खिद्रापूर (कोल्हापूर)

Amba-Jungle=-banner

आंबा  जंगल - खिद्रापूर (कोल्हापूर)

मान्सून मॅजिक कॅम्प
दिनांक १३ सप्टेंबर २०१४ ते १७ सप्टेंबर २०१४ 
दिनांक : २ रात्र आणि ३ दिवस

कोल्हापूर पासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल सह्याद्रीच्या कुशीतील आंबा जंगल हे कोल्हापूर जिल्यातील निसर्गच वरदान लाभलेल जंगल आहे. निसर्ग अभ्यासकांबरोबर जंगलातील पशू ,पक्षी , कीटक यांना प्रत्यक्ष पाहण्याबरोबरच निसर्गाच्या औदार्याच्या पाऊलखुणा पाहत पद्भ्रमणाच्या आनंदासोबत पावसाळ्यातील अरण्याची विविध रूपे भ्रमंती व अरण्यवाचन , त्याच प्रमाणे कोल्हापूर पासून ७० कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा एक अति उत्कृष्ट आहे . हे मंदिर महाराष्ट्राचे प्रती कोणार्क सूर्य मंदिर म्हणून ओळखले जाते. १२ व्या शतकातील शिलाहार राजांनी ह्या मंदिराची स्थापना केली आहे. येथील देखणी कोरीव लेणी पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो . तसेच पंचगंगा - कृष्णा नदीच्या संगमावर असलेले नरसोबाची वाडी येथील श्री दत्ताचे पण दर्शन घेणार आहोत. अशा प्रकारे मोन्सून मेअजिक बरोबरच स्थापत्य कला आणि देवदर्शन असा त्रिवेणी लाभ घेणे वेगळाच अनुभव ठरेल.

दिनांक

 •   १३ सप्टेंबर २०१४ ते १७ सप्टेंबर २०१४
  २ रात्र ३ दिवस 

सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

 •   

सहलीचा कार्यक्रम:

 • १ ला दिवस : छत्रपती शिवाजी टर्मीनस येथून रात्री ८.२० मिनिटांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस  ने कोल्हापूर कडे प्रयाण. कोल्हापूर पर्यंत प्रवास ट्रेन मध्ये.
 • २ रा दिवस : कोल्हापूर ते आंबा जंगल परिसर
  सकाळी ८.२० वाजता कोल्हापूरला आगमन. कोल्हापूर हून नाष्टा करून आंबा राखीन जंगल कडे  प्रयाण. मध्ये  पावन गडावर निरीक्षण व पद्भ्रमंती  आंबा येथील रीसोर्टवर आगमन .दूपारी  आंबे  देवराई परिसरात भ्रमंती व निरीक्षण. रात्री मुक्काम आंबा घाट
 • ३ रा दिवस : आंबा जंगल ते कोल्हापूर
  सकाळी ५.०० वेकअप कॉल.तज्ञांबरोबर मानवलीच्या सड्याकडे प्रयाण. रानफुले,वनस्पती, पक्षी निरीक्षण करत पदभ्रमंती. रात्री कोल्हापूर येथे मुक्काम.
 • ४ था दिवस : कोल्हापूर - खिद्रापूर - मुंबई
  सकाळी महलक्ष्मी दर्शन त्याचप्रमाणे खुर्दापुरला भेट . नरसोबाची वाडी दर्शन करून कोल्हापूर स्टेशन कडे प्रयाण ,आगमन ऱत्रि ८. २० वाजता महालक्ष्मी ट्रेन पकडून मुंबई कडे प्रयाण
 • ५ वा दिवस : आनंदी व अविस्मरणीय आठवणींसह मुंबई येथे आगमन .

विशेष सूचना :

 • प्रवासाला निघताना जरुरीच्या वस्तु :-  टोपी (शक्यतो हिरव्या/ करड्या रंगाची), पाण्याची बाटली, स्वत:ची  औषधे, पावसाळी पादत्राणे, कानटोपी/ स्कार्फ व इतर हलके समान ,छत्री, रेनकोट व पावसात वापरता येतील असे कपडे.
 • स्वताच्या जबाबदारीने आणावयाचा वस्तु :  कॅमेरा, हॅंडिकॅम, बायनाक्युलर(दुर्बीण)

सुगंधी द्रव्याचा वापर कटाक्षाने टाळावा.
वरील कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकाकडे राहतील याची कृपया नोंद
घ्यावी